Empowering the Consumer

केंद्रीय ऊर्जा मंत्रालय व इंडीयन चेंबर ऑफ़ कॉमर्सच्यावतीने आयोजित १३ व्या इंडियन एनर्जी समिटमध्ये ऊर्जा क्षेत्रातील प्रभावी कामगिरीबद्दल महावितरणला देशपातळीवर मानाचा तृतिय क्रमांकाचा एफ़िशियंट ऑपरेशन (नेटवर्क एफ़िशिएन्सी, डीएसएम) पुरस्कार – वीज यंत्रणेचे प्रभावी जाळ आणि वीजेच्या मागणीचे प्रभावी व्यवस्थापन याकरिता पुरस्काराने गौरविण्यात आले. हरित ऊर्जा क्षेत्रात दिलेल्या प्रभावी योगदानासाठी तृतिय क्रमांकाचा ग्रीन एनर्जी (आरई उपक्रम, आरपीओ, सोलर रूफटॉप, ईव्ही, एनर्जी स्टोरेज) पुरस्कार – नवीन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्र, नवीकरणीय वीज खरेदीचे दायित्व, छतावरील सौर ऊर्जानिर्मिती, विद्युत वाहने चार्जिंग केंद्रासाठी महावितरणने आखलेले धोरण व त्याची अंमलबजावणी आणि विजेची साठवणूक या क्षेत्रात महावितरणने केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी महावितरणला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवनवीन उपक्रमांना अंगिकारीत त्यांचा झालेला प्रभाव यासाठीचा प्रतिष्ठित तृतिय क्रमांकाचा इनोव्हेशन विथ इम्पेक्ट (सामान्य राज्ये) पुरस्कार – नवनविन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्याच्या प्रभावी वापरासोबतच ग्राहकांना या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याप्रती जागृत करण्यासाठी महावितरणने प्रभावीपणे राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी महावितरणला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
सर्व हक्क सुरक्षित. संकेतस्थळाची मालकी आणि देखभाल : महावितरण
प्रकाशगड, प्लॉट नंबर जी-९,अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) , मुंबई – ४०००५१



धोरणे आणि अस्वीकार | डेटा संरक्षण धोरण
साइटमॅप | वेबसाइट धोरणे