Empowering the Consumer
मुख्यपृष्ठ » महावितरण विषयी » कंपनीची ओळख
महावितरण ही भारतातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपन्यांपैकी एक असून, ती आपल्या विस्तृत वितरण जाळ्याद्वारे आणि तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धतीद्वारे संपूर्ण शहरी व ग्रामीण महाराष्ट्रात विश्वसनीय आणि परवडणारी वीज पुरवते.
ग्राहक
कार्यबल
उपकेंद्रे
रोहित्र
अपारंपरिक (नूतनीकरणक्षम) ऊर्जा
आशिया खंडातील सर्वात मोठ्या वीज वितरण यंत्रणांपैकी एक महावितरणची वीज यंत्रणा आहे. महाराष्ट्रातील ४१,९२८ गावे आणि ४५७ शहरांपर्यंत विस्तारलेल्या महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचा व्याप आशिया खंडातील सर्वात मोठ्या वितरण जाळ्यांमध्ये गणला जातो. उपकेंद्रे, उच्चदाब वाहिन्या, वीजवाहक फीडर्स आणि विस्तृत वीज पायाभूत सुविधांच्या बळावर महावितरण वीजसेवेचे जाळे समर्थपणे सांभाळत आहे.
महावितरणच्या भव्य वितरण जाळ्याची व्याप्ती
ग्राहकांना अधिक जलद, सुलभ आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केला आहे. विविध डिजिटल सेवा, मोबाइल अप्लिकेशन्स, स्मार्ट मीटरिंग आणि आधुनिक देखरेख प्रणालींच्या माध्यमातून ग्राहकसेवेचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासोबतच कार्यक्षमतेत आणि वीजसेवेच्या विश्वासार्हतेत वाढ केली जात आहे.
डिजिटल ग्राहकसेवेची प्रमुख वैशिष्ट्ये

नवीकरणीय ऊर्जेची खरेदी आणि कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जाकरण यांसारख्या उपक्रमांतून महावितरण शाश्वत ऊर्जा विकासाला चालना देत आहे. स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यासोबतच ग्रामीण भागातील कृषी ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि कार्यपद्धतीचे सुसूत्रीकरण यांच्या माध्यमातून महावितरणने कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा केली आहे. परिणामी, एकूण तांत्रिक व वाणिज्यिक वीजहानी (AT&C Losses) कमी करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.
AT&C वीजहानी कमी करण्याचे उद्दिष्ट
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकश्री. लोकेश चंद्र (भा.प्र.से.)
हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
सर्व हक्क सुरक्षित. संकेतस्थळाची मालकी आणि देखभाल : महावितरण
प्रकाशगड, प्लॉट नंबर जी-९,अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) , मुंबई – ४०००५१



धोरणे आणि अस्वीकार | डेटा संरक्षण धोरण
साइटमॅप | वेबसाइट धोरणे