Empowering the Consumer

महावितरणला डिजिटल इनोव्हेशन इनिशिएटिव्ह (ट्रान्सपोर्ट आणि मोबिलिटी) श्रेणी अंतर्गत त्याच्या EV उपक्रमांसाठी प्रतिष्ठित Elets इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
श्री प्रसाद रेशमे (संचालक प्रकल्प) यांना आत्मनिर्भर भारत समिटमध्ये डॉ रवी गुप्ता (संस्थापक, सीईओ आणि मुख्य संपादक, इलेट्स टेक्नोमीडिया) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणच्या ईव्ही उपक्रमांमध्ये महावितरणचे स्वतःचे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, ईव्ही वापरकर्त्यांसाठी पॉवरअप मोबाइल अँप, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन सेंटर सोल्यूशन आणि वेब पोर्टल यांचा समावेश आहे. पॉवरअप मोबाईल अँप हे 4 व्हीलर ईव्ही मालकांसाठी महावितरणच्या चार्जिंग स्टेशनवर ईव्ही चार्ज करण्यासाठी विकसित केले आहे. मोबाईल अँपमध्ये ‘मॅप-मी’ वैशिष्ट्य आहे ज्याद्वारे महावितरणच्या अंतर्गत नसलेल्या चार्जिंग स्टेशन स्थानकांचे स्थान आणि तपशील देखील प्रदर्शित केले जाऊ शकणार. हे अँप विविध ठिकाणी जसे की महावितरणची विविध कार्यालये, सबस्टेशन्स इत्यादींवर महावितरणच्या मानवरहित ईव्ही चार्जिंग स्टेशनचे निरीक्षण, डेटा लॉगिंग आणि डेटा विश्लेषण करण्याची सुविधा देते.
हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
सर्व हक्क सुरक्षित. संकेतस्थळाची मालकी आणि देखभाल : महावितरण
प्रकाशगड, प्लॉट नंबर जी-९,अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) , मुंबई – ४०००५१



धोरणे आणि अस्वीकार | डेटा संरक्षण धोरण
साइटमॅप | वेबसाइट धोरणे